Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
मुंबई : Shivsena UBT On Amit Shah | भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात (BJP Executive Meeting In Pune) बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला होता. औरंगजेब फॅन क्लबचे (Aurangzeb Fan Club) नेते उद्धव ठाकरे असल्याचे वक्तव्य अमित शहा यांनी केले होते.
अमित शहा म्हणाले, ” कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत (Congress) उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक (Zakir Naik) यांना शांतता दूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, पीएफआय या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला (Chatrapati Sambhajinagar) विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे. राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब ‘ म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi). आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे,” अशी बोचरी टीका अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, ” औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही. आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. (Shivsena UBT On Amit Shah)
“मुळात लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात येऊन अमित शहा यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
मात्र तरीही महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा दारुण पराभव केला. त्याचा हा आक्रोश आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत.
आम्ही भाजपाप्रमाणे काम करत नाही. आम्ही ईव्हीएम, निवडणूक रोखे आणि ईडी-सीबीआयचे घोटाळे (ED-CBI Scam) करून निवडणूक जिंकत नाही.
आम्हाला जनतेने स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केले आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा