IAS Officer Wife Death Case | IAS अधिकाऱ्याच्या बायकोचं गँगस्टरशी अफेअर, अपहरण प्रकरणात नाव; विषप्राशन करुन जीव दिल्यानं प्रचंड खळबळ
गुजरात : IAS Officer Wife Death Case | गॅंगस्टरशी अफेयर असणाऱ्या गुजरातच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने घरासमोरच विष प्राशण करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद-विवाद सुरु होते, ते एकत्रही राहत नव्हते. त्यानंतर ती अचानक घरी आली. जेव्हा तिला घरात घेण्यास नकार देण्यात आला तेव्हा तिने घरासमोरच विष प्राशन केले. (Gujarat IAS Officer Ranjit Kumars Wife Affair)
त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रविवारी (२१ जुलै) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ४५ वर्षीय सूर्या जे असं या महिलेचं नाव आहे. ती तमिळनाडूची रहिवासी होती आणि तिथल्याच एका गँगस्टरसह पळून गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आयएएस पत्नी सूर्याने नऊ महिन्यांपूर्वी पतीला सोडले होते. ती गँगस्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. गेल्या आठ महिन्यांपासून ती गुजरातमध्ये नव्हती. इकडे आयएएसने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले होते. इतकंच नाही तर जेव्हा सूर्या सासरी परतली तेव्हा तिला घरात येण्यासही नकार देण्यात आला. त्यानंतर तिने पतीच्या घराबाहेरच विषप्राशण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक टाळण्यासाठी सूर्या तिच्या पतीच्या घरी गेली असावी,
अशी पोलिसांकडून माहिती मिळत आहे.
सूर्याचं नाव तिच्या कथित गँगस्टर बॉयफ्रेंड ‘हायकोर्ट महाराजा’सोबत अपहरण प्रकरणात पुढं आलं होतं.
या कामात त्यांचे सहकारी सेंथिल कुमार यांनीही त्यांना साथ दिली होती. (IAS Officer Wife Death Case)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या