Pune Crime News | सणसवाडीत महिलांकडून अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न; शिक्रापूर पोलिसांत 2 महिलांसह 6 इसमांवर गुन्हा दाखल

shikrapur police station

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Sanaswadi Pune Crime News | पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सणसवाडी ता. शिरुर येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर इसमाला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावलेले असताना काही महिलांसह इसमांनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अश्विनी शांतीलाल तांबे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र पुंजाजी पगार, लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद, रामकृष्ण रामचंद्र गिरमकर, प्रवीण रावसाहेब ढवळे यांसह तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shikrapur Police Station)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सणसवाडी ता. शिरुर येथील अश्विनी तांबे यांची इमारत एका डॉक्टरच्या ओळखीने राजेंद्र पगार यांना भाडे तत्वावर देण्यात आलेली होती, सदर इमारतीचा भाडे करारनामा केला असता आघाऊ रकमेचे चेक पगार यांनी तांबे यांना दिलेले होते. मात्र सदर चेक बँकेत भरल्यानंतर वटले नसल्याने पगार यांनी चेक परत द्या मी रोख रक्कम देतो असे म्हणून चेक परत घेत, तसेच इमारतीमध्ये काम देखील चालू केले मात्र रक्कम देण्यात टाळाटाळ करु लागल्याने तांबे यांनी राजेंद्र पगार यांना नोटीस पाठवत सदर इमारतीला काही दिवसांपूर्वी कुलूप लावले, त्यांनतर २१ जुलै रोजी अचानक काही महिला व इसम सदर इमारतीचे कुलूप तोडून आतमध्ये आल्याचे तांबे कुटुंबांना सीसीटीव्हीच्या नोटिफिकेशन द्वारे समजले.

त्यानंतर तात्काळ तांबे यांनी त्या ठिकाणी जाऊ संबंधितांना तुम्ही इथे कशासाठी आलात ? माझ्या इमारतीचे लॉक का तोडले ?असे विचारले असता, त्यातील एका महिलेने तिचे नाव लताताई सिरसट असे सांगून आम्हाला राजेंद्र पगार यांनी पाठवले असल्याचे सांगितले. यावेळी तांबे यांनी तातडीने पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस कंट्रोलरूम ला फोन केला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी जात तेथील महिला व इसमांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील तीन जण पळून गेले,

याबाबत अश्विनी शांतीलाल तांबे वय ४५ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन
येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राजेंद्र पुंजाजी पगार रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, लताबाई बुवाजी शिरसाट,
बेगम उस्ताद सय्यद दोघी रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, रामकृष्ण रामचंद्र गिरमकर रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे,
प्रवीण रावसाहेब ढवळे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांसह तीन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्त्तनवार हे करत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed