Pune Crime News | पुणे : खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून तरुणाचा खून, हडपसर परिसरातील घटना
पुणे : Hadapsar Pune Crime News | खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून (Murder In Hadapsar Pune) केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान रामटेकडी (Ramtekdi) ब्रिजजवळ असलेल्या रेल्वे पटरीच्या कडेला घडली आहे.
फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय-33 रा. रामटेकडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत फरहानचा भाऊ फरीद अब्दुल रज्जाक शेख (वय-30 रा. रामटेकडी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. तर सिद्धेश्वर दिलीप चव्हाण, भैय्या उर्फ प्रसाद विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फरहान शेख आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. फरहान याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी रात्री आरोपींनी संगनमत करुन फरहान याला दारु पिण्याच्या बहाण्याने रामटेकडी परिसरातील रेल्वे पटरी जवळ नेले. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून फरहान याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यामध्ये फरहान गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे पटरीवर फेकून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख (Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (Santosh Pandhare), पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते (PI Umesh Gite)
यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या