Aditya Thackeray On Mahayuti Govt | पोलिसांवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची वेळ; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; म्हणाले,…

मुंबई : Aditya Thackeray On Mahayuti Govt | मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे (Mumbai Rains). हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात आणखी पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) देखील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलिस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी खड्डे बुजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमातून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप आणि मिंधे सरकारच्या कंत्राटदार मित्रांऐवजी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांची मदत केली जात आहे. एखाद्या कंत्राटदाराला किंवा कंत्राटी कंपनीच्या मालकाला शासनाने असे खड्डे भरण्यास भाग पाडले आहे का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) टॅग करत त्यांनी खड्ड्यांबाबत पोस्ट शेयर करून टीका केली आहे.
या बाबत एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुमीत कुमार म्हणाले की, एनएचएआयने नियुक्त केलेले कंत्राटदार दुरुस्तीची कामे करतात, परंतु आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असावी म्हणून पोलिसांनी तातडीने खड्डे बुजवले असावे. (Aditya Thackeray On Mahayuti Govt)
“येथील खड्ड्यांमुळे वाहनचालक तासनतास वाहतुकीत अडकून पडत असल्याचे निदर्शनास आले.
वाहनचालक संतप्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,
असेही या पाहणीत आढळल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
यासाठी पोलिसांनी पेल्हार जंक्शनवरील खड्डे सिमेंटने भरण्याची जबाबदारी हातात घेतली,
असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या