Maharashtra Assembly Election 2024 | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना’
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | महायुती सरकारने (Mahayuti Govt) आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘लाडकी बहीण, लाडका भाऊ’ योजना सुरु केलेल्या आहेत. या योजनांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या (OM Awas Yojana) नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदारानंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
वडेट्टीवार म्हणाले , “सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी महायुती सरकारने खुली ठेवली आहे. हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का हा देखील प्रश्न आहे. मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे”, अशी टीका त्यांनी केली. (Maharashtra Assembly Election 2024)
ते पुढे म्हणाले, ” २०२१ मध्ये या विकसकाशी म्हाडाने करार केला
मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही
असे असताना त्याला ४०० कोटींची खिरापत का दिली जातेय.
गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला.
त्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणतंय याची चौकशी झाली पाहिजे”,
अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या