Pune Crime News | पुणे: ‘तु माझी झाली नाही तर…’ तरुणीचा पाठलाग करुन ब्लेडने वार करण्याची धमकी; धायरी परिसरातील घटना

Molestation

पुणे : Dhayari Pune Crime News | तरुणी ने नकार दिला असताना देखील तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला रस्त्यात अडवून जबरदस्तीने अंधारात नेऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तु माझ्याशी लग्न केले नाही तर ब्लेडने वार करीन अशी धमकी दिली. हा प्रकार धायरी परिसरात जुन 2024 ते 19 जुलै 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 18 वर्षीय पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक प्रकाश गायकवाड Deepak Prakash Gaikwad (रा. गल्ली नं. 90, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याच्यावर भान्यास कलम 74, 75, 78, 115, 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत होता. तरुणीने त्याला माझा पाठलाग करु नको असे सांगितले तरी देखील तो तिचा पाठलाग करत होता. (Molestation Case)

पीडित तरुणी धायरी येथील रोडवरुन जात असताना आरोपीने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला. त्याने त्याची दुचाकी आडवी लावून तीची वाट आडवली. याबाबत मुलीच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने तरुणीच्या आईसोबत उद्धट बोलला. त्यानंतर धायरी परिसरातील एका मंदिराजवळ दुचाकी आडवी लावून मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिली.

आरोपीने तिचा हात पकडून एका अंधाऱ्या ठिकाणी जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.
तसेच तु माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन.
तु माझी नाही झाली तर मी मी कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली.
तसेच मुलीचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed