Manorama Khedkar | मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे : Manorama Khedkar | वादग्रस्त आयएएस अधिकारी (Controversial IAS officer) पूजा खेडकरची (Puja Khedkar) आई मनोरमा खेडकर यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात आज (दि.22) हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौड पोलिसांनी (Paud Police) महाडमधून अटक केली होती.
मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मनोरमा खेडकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडी म्हणजेच येरवडा कारागृहात होणार आहे. (Manorama Khedkar)
मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि
मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोरमा खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहिता
चे कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अँक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय.
शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या