Pune PMC Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार
पुणे : Pune PMC Water Supply | गुरुवार 25 जुलै रोजी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र अंतर्गत असलेल्या एमएलआर टाकी वरुन भवानी पेठेकडे जाणाऱ्या 600 मिमी व्यासाच्या एम.एस. लाईनवर स्वारगेट मेट्रो स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही गळती थांबवण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.25) या जलकेंद्र अखत्यारील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवारी (दि.26) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती एमएलआर (MLR) टाकी – शंकर शेठ रोड परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर, पर्वती दर्शनाचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंद नगर, महर्षिनगर चा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी इ. (Pune PMC Water Supply)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या