IAS Puja Khedkar | खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मागवला अहवाल
पुणे : IAS Puja Khedkar | | प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचे नवनवे कारनामे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल आहे. असे असतानाच आता पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे.
पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राज्य सरकारकडे खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे का ? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाकडे नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करून परीक्षा दिली होती. पुढे खेडकर यांची आयएएस म्हणून निवड झाली. सध्या त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी महाराष्ट्रात सुरू होता. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न काही कोटींमध्ये असल्याचे समोर आले आहे. नॉनक्रिमीलेअर विशिष्ट उत्पन्नाची अट आहे. परंतु, खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी म्हणून कार्यरत होते, असे असताना त्याचे उत्पन्न कमी कसे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. (IAS Puja Khedkar)
या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तिने आई – वडिलांचा घटस्फोट झाल्याचे आयोगाला सांगत नोकरी मिळवली होती. आता त्यांच्या याच नॉनक्रिमिलेअर बाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) आणि वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांचा खरंच घटस्फोट झाला होता का? ते घटस्फोटानंतर एकत्र राहत होते का? का केवळ पूजा यांना अधिकारी पदावर बसवण्यासाठी घटस्फोट घेण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी याबाबतचा अहवाल मागवला आहे. त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (Criminal Investigation Department Maharashtra State – CID Maharashtra) पत्रव्यवहार केला आहे.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आयएएस होते. ४० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात दिसते.
तरीही पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळवले?
पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक
Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य