Shivsena UBT On Union Budget | हा अर्थसंकल्प म्हणजे ‘पंतप्रधान सरकार बचाव योजना’; ठाकरे गटाची टीका
मुंबई : Shivsena UBT On Union Budget | एनडीए सरकारच्या (NDA Modi Govt) तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज मांडला. सीतारामन यांचं भाषण संपताच विरोधकांनी बजेटवर टीकेची झोड उठवली आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेलं झुकतं माप पाहून विरोधक संतापले आहेत.
हे बजेट फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी होतं का? एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रासाठी काय आणलं,’ असा सवाल विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा केली नसल्यावरून टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “मला वाटते की, या अर्थसंकल्पाला ‘पंतप्रधान सरकार बचाव योजना’ म्हणायला हवे. कारण त्यांना हे लक्षात आले आहे की पुढील पाच वर्षांसाठी हे सरकार वाचवायचे असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा नाकारल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना निधी दिला. केंद्राकडून महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातून पैसा हवा आहे. परंतु, महाराष्ट्रातील विकास, योजना यांसाठी काही नाही”, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. (Shivsena UBT On Union Budget)
दरम्यान, महाराष्ट्रातील महायुती एनडीएचा घटक पक्ष आहे.
परंतु, महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत सरकार अवाक्षर काढत नाही.
ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक
Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य