Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Khadakwasla Dam

पुणे : Khadakwasla Dam | यंदा मोसमी पावसाचे वेळेत आगमन होऊनही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे (Pune Rains). घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, सोमवार पासून पावसाचा जोर वाढला असल्याने पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत असणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झाल्याने खडकवासला धरण १०० टक्के भरले असून मध्यरात्री पासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे (Mutha River). त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

शहराला टेमघर (Temghar Dam) , वरसगाव (Varasgaon Dam), पानशेत (Panshet Dam) आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत मिळते. (Khadakwasla Dam)

खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून मुठा नदीपात्रात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून ४७०८ एवढा करण्यात आला.
धारण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य

You may have missed