Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)
पुणे : Kothrud Hit & Run Case | दिवसेंदिवस शहरात हिट अँड रन च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोथरूड परिसरात आणखी एक हिट अँड रन चा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (Kothrud Pune Accident News)
यामध्ये भरधाव खासगी बसने दुचाकीस्वार आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा व मॅक्स गाडीला धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना कोथरूड येथील वनाज कॉर्नर परिसरात (Vanaz Corner kothrud) बुधवारी (दि.२३) घडली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वनाज कॉर्नरजवळ सकाळी भरधाव बसचालकाने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि मॅक्स गाडीला धडक दिली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. (Kothrud Hit & Run Case)
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
खासगी बसचालक आरोपी बाळू बाळासाहेब थोरात Balu Balasaheb Thorat (रा. चाफेकर चौक, चिंचवड – chafekar chowk pune ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक
Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य