Ajit Pawar – Amit Shah | शरद पवारांना शह देण्याची रणनीती? अमित शाह यांच्यासोबत अजित पवारांची मध्यरात्री बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar - Amit Shah

मुंबई – Ajit Pawar – Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 20 आणि 21 जुलै रोजी पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची बैठक झाली होती. आता पून्हा एकदा दोघांची दिल्ली ला बैठक झाली आहे. मध्यरात्री एक वाजता दोघे भेटल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणूकांमध्ये शरद पवारांना (Sharad Pawar) कसा शह देता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) डोळयासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणूकांमध्ये बसलेल्या फटक्यांपासून धडा घेत महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. भाजपा कार्यकर्त्यांना (BJP Workers) बळ मिळावे या हेतूने नुकतेच अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शाह आणि अजित पवार यांची बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ते शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते.

त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) देखील होते. मध्यरात्री एक वाजता विस्तृत चर्चा झाली. यात आगामी निवडणूकांमध्ये शरद पवार यांना कशाप्रकारे शह देता येऊ शकतो यावर चर्चा झाल्याचे समजतं. तसेच विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं जागा वाटप मंत्रिमंडळ विस्तार यावरही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करून सरकारच्या कामाची गती वाढवायला हवी अशी भूमिका अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी मांडली आहे.
त्यावर ही चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीतच अजित पवार यांच्या दिल्लीवारीने राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला असल्याचे स्पष्ट होत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

You may have missed