Hanuman Dand | स्वता:ला ठेवायचंय फिट तर नियमित करा हनुमान दंड

Hanuman Dand

ऑनलाइन टीम – Hanuman Dand | डोक्यापासून पायापर्यंत फायदेशीर असणारा भारतीय व्यायाम प्रकारांतील एक प्रकार म्हणजे हनुमान दंड होय. आजही बॉडीबिल्डर आणि कुस्तीपटू हनुमान दंड करून स्वता:ला फिट ठेवतात. कोणत्याही उपकरणाची गरज नसलेला हा व्यायाम प्रकार घरी ही सहज करण्याजोगा आहे. (What Is Hanuman Dand Yoga)

असा करावा हनुमान दंड

नॉर्मल पुश अपच्या तुलनेत हनुमान दंड शरीराच्या सर्व स्नायूंवर अधिक कार्य करते. त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो. मात्र हा व्यायाम योग्यरितीने केला गेला तरच लाभ मिळतात. हनुमान दंडाचेही काही नियम आहेत. हा प्रकार करण्यापूर्वी नेहमी स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग तुम्हाला हनुमान दंड करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार करेल. त्यामुळे कॅलरीजही बर्न होतात आणि स्नायू सैल होतात.यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी असते. नॉर्मल पुश अप करताना जसे करतात त्याच आसनात आल्यानंतर उजवा पाय तुमच्या डाव्या हाताच्या जवळ ठेवा आणि हळूहळू तुमची छाती वर आणि खाली जमिनीच्या दिशेने हालवा. डाव्या पायाले समान प्रक्रिया पुन्हा करा. हे दररोज 10 ते 12 वेळा करा.

हे आहेत फायदे

हनुमान दंड छाती, खांदे, पाठ, ट्रायसेप्स आणि कोर स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते. या व्यायामामुळे हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. हनुमान दंड नियमित केल्याने शरीरातील समन्वय आणि संतुलन सुधारता येते. हे बध्दकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. या प्रकारामुळे रक्तप्रवार वाढतो, ज्यामुळे ह्दय निरोगी राहते. एवढेच नाही तर हनुमान दंड मानसिक आरोग्यासाठीही चांगला आहे. हा व्यायाम तणाव आणि चिंता कमी करण्यास उपयुक्त आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

You may have missed