Pune Accident News | गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात; नांदेड सिटीतील घटना; महिला गंभीर जखमी
पुणे : Nanded City Pune Accident News | सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील नांदेड सिटी येथे एका चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नांदेड सिटीतील डीसी मॉल जवळ घडला. याप्रकरणी संतोष शिवाजी गायकवाड Santosh Shivaji Gaikwad (रा. धायरी, पुणे) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nanded City Hit & Run Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक संतोष गायकवाड हे शिक्षक असून ते आपल्या चारचाकी वाहनाने मावळ येथे असणाऱ्या शाळेत निघाले होते. दरम्यान नांदेड सिटीतील डीसी मॉल जवळ आल्यानंतर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली.
यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने वाहनचालक गायकवाड याला जबर मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी येत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद