Pune Collector Order | सिम्बॉयोसिस विद्यापीठ किवळे परिसरात शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे : Pune Collector Order | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्बॉयोसिस विद्यापीठ किवळे (Symbiosis University Kiwale), ता.मुळशी (Mulshi Taluka) या परिसरातील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी जारी केले आहेत.
राष्ट्रपती यांच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने पेरिविंकल इंग्रजी माध्यम शाळा सुस, डॉल्फिन इंग्रजी माध्यम शाळा तापकीर वस्ती, विद्या वॅली शाळा, सुस, श्रीनिवास पुर्व प्राथमिक शाळा, नानासाहेब ससार इमारत, सुस, आदित्य पूर्व प्राथमिक शाळा, पारखे वस्ती, सुसगांव, पोद्दार जंबो किड्स, सुसगांव, ट्रीहाऊस माध्यमिक शाळा, पारखे वस्ती, सुसगांव, आर्चिड आंतरराष्ट्रीय शाळा, सुस, जिल्हा परिषद शाळा, सुसगांव कमान, संस्कारोदय प्राथमिक शाळा, शितळादेवीनगर, लिटील बेरीएस पूर्व प्राथमिक शाळा, ठकसेन नगर, किड्झी पूर्व प्राथमिक शाळा, सुसगांव, श्री विद्या पूर्व प्राथमिक शाळा व ध्रुव ग्लोबल शाळा,सिम्बॉयोसिस, लवळे या शाळा बंद ठेवण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Pune Collector Order)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद