Pune News | काजू बीसाठी शासन अनुदान योजनेकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : Pune News राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू हंगाम- २०२४ करीता काजू बी शासन अनुदान योजना सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकडे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
कोकण विभाग व कोल्हापूर जिल्ह्यामधील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य किंवा विभागीय कार्यालय तर अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत काजू बी विक्री पावती, ७/१२ उतारा, आधार संलग्नित बँक खाते, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावीत.
राज्यातील काजू उत्पादक या योजनेचे लाभार्थी असणार आहे. याकरीता काजू उत्पादक ७/१२ वर काजू लागवडीखालील क्षेत्र, झाडांची नोंद असावी. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करुन घ्यावे. उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बी विक्री करावी. काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता नमूद असावे. (Pune News)
योजनेबाबत अधिक माहितीसाठी रत्नागिरी विभागीय कार्यालयाचे सहायक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी ८७८८५०८०९९/ ९४२२३९२२३८ यांच्याशी संपर्क साधावा.
राज्यातील अधिकाधिक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद