Pune Rain | पुणे शहरात 24 ठिकाणी झाडपडीच्या घटना; कोणतीही जीवितहानी नाही मात्र वाहनांचे नुकसान

Tree felling incidents in pune

पुणे : Pune Rain | शहरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील विविध भागात २४ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मंगळवार (दि.२३) सकाळी १० ते बुधवार (दि.२४) सकाळी १० दरम्यान याची नोंद झाली आहे. झाडपडीच्या या घटनांत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच झाडपडीच्या घटनांमुळे वाहतूक कोंडीही (Pune Traffic Jam) झाल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यासह शहरात खडकवासला, धायरी, औंध, कोथरूड, वारजे, शिवाजीनगर, कात्रज , बालेवाडी आणि कोरेगाव पार्क परिसरात मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्याचदरम्यान काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर , वाहनांवर पडल्या. त्यामुळे अग्निशामक विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. झाडपडीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच कोणीही जखमी नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. (Pune Rain)

याठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना,

१) औंध, अनंत पार्क
२) एरंडवणा, नवनाथ मिञ मंडळ
३) महर्षी नगर, ठाकुर बेकरी
४) नवी पेठ, म्हाञे पुलानजीक
५) वानवडी, महंमदवाडी रस्ता
६) शुक्रवार पेठ, सुभाष नगर
७) एफ.सी रोड, दीनदयाल हॉस्पिटल
८) जाभुंळवाडी रस्ता
९) उंड्री, होले वस्ती
१०) फातिमानगर
११) बालेवाडी, प्रथमेश पार्क
१२) कोथरुड, डहाणूकर कॉलनी
१३) कोथरुड, वनाज कंपनी जवळ
१४) मंगलदास रस्ता
१५) खडकमाळ आळी
१६) क्वीन्स गार्डन
१७) गुलटेकडी, मिनाताई ठाकरे वसाहत
१८) विमाननगर
१९) कळस गावठाण
२०) एरंडवणा, दिनानाथ हॉस्पिटल
२१) बाजीराव रस्ता
२२) सिटीप्राईड, उत्सव हॉटेल
२३) औंध, आयटीआय रस्ता
२४) कोथरुड, हॅप्पी कॉलनी

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

You may have missed