Vijay Diwas Satara | सातारा येथील कारगिल विजय दिवस कार्यक्रम CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस व DCM अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार; सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : Vijay Diwas Satara | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शुक्रवार २६ जुलै २०२४ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाकरीता पुणे जिल्ह्यातील सर्व कारगिल युद्ध शहीद परिवार, शौर्य पुरस्कार विजेते व जखमी सैनिकांना या कार्यक्रमाकरीता घेवून जाण्या-येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर इच्छुक माजी सैनिक, सैनिक पत्नी, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना या कार्यक्रमास जाण्यासाठी महासैनिक लॉन्स, सैनिक कल्याण विभाग, घोरपडी, पुणे येथून दोन बस २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ६.३० वा. जाणार आहेत. तरी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे आपली नावे नोंदवावीत. प्रथम नाव नोंदणी करण्याऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दे. (नि.) यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद