Eknath Shinde On Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे : Eknath Shinde On Pune Rains | पुण्यात धडकी भरवणारा मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोसायट्यांमध्ये छातीएवढे पाणी साठले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे.
तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहोचत आहे. तसेच वेळ पडल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल “, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde On Pune Rains)
ते पुढे म्हणाले, ” खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे.
यापार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी देखील बोललो आहे.
मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत “, असेही शिंदे यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी