Pune Rains | भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली ! कोरेगाव पार्कमध्येही भिंत कोसळली, अनेक ठिकाणी पाणी शिरले

Pune Rains

पुणे : Pune Rains | शहरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भवानी पेठेतील (Bhawani Peth Pune) एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली. सुदैवाने वाड्यात कोणी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.

शहरात विक्रमी पाऊस सुरु आहे. जोरदार वारा व पाऊस यामुळे गेल्या २४ तासात शहरात तब्बल ४५ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. भवानी पेठेतील एका वाड्याची भिंत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पडली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील बर्निग घाटनजीक (Burning Ghat Road Koregaon Park) एका सोसायटीची सीमा भिंत कोसळली. भिंती शेजारील रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला आहे.

खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील सोसायट्या, वस्त्या, रजपूत वीटभट्टी, शिवणे, सिंहगड रोडवरील सोसायट्या, पुलाची वाडी, शिवाजीनगर परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed