Aadarwadi Maval News | मुसळधार पावसामुळे मावळात डोंगराचा कडा कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

पुणे : Aadarwadi Maval News | मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. पुढील काही तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळून ढिगारा रस्त्यावर आला आहे. तर काही दगडी येथील हॉटेल पिकनिक येथे कोसळल्याने एकाचा मृत्यू तर १ जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मावळ तालुक्यातील आदरवाडी गाव परिसरात काल रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील एका डोंगराचा कडा तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मी आहे. १० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रस्त्यावर पसरला आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी किमान ५-६ तास तरी लागणार आहेत. यातील एक कडा हा पिकनिक हॉटेल येथे कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी आहे. (Aadarwadi Maval News)
जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) हे जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी