Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर पुणेकरांच्या मदतीसाठी उतरले रस्त्यावर; बचाव व मदत कार्य तत्परतेने करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : Ravindra Dhangekar | पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पुर परिस्थिती आहे (Pune Flood). अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे (Pune Rains). त्यामुळे केवळ कार्यालयात बसून नियोजन न करता रस्त्यावर उतरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर लोकांची प्रत्यक्ष मदत करीत आहेत. नागरिकांच्या अडचणी जाणून घेवून प्रशासनाकडून त्या सोडवून घेत आहेत.
पुण्यात मध्यरात्री पासून पावसाचे थैमान सुरू आहे. सिंहगड रस्ता (Sinhagad Road Pune) व इतर भागातील अनेकांच्या घरात, अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले आहे. पावसाच्या पाण्यात वाहने वाहून जात आहेत. त्यामूळे असंख्य पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अतिवृष्टीचा व पूर परिस्थितीचा आढावा आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतला.
पुलाची वाडी (Pulachi Wadi) येथील विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबीयांची धंगेकर यांनी भेट घेतली. त्यांना धीर दिला. ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar Temple) भागात ज्या ठिकाणी पाणी शिरले आहे तिथंही जावून धंगेकर यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. (Ravindra Dhangekar)
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. पालिका अधिकारी, आपत्ती निवारण कक्षातील अधिकारी
यांना तातडीने दूरध्वनी करून पुणेकरांच्या समस्या मांडून त्या सोडवून घेत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनातील,
पालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी बचाव व मदत कार्यात कोणताही विलंब न करता
लोकांना आवश्यक ती तत्परतेने मदत करावी, अशा सूचनाही धंगेकर यांनी यावेळी दिल्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी