Peshwa Lake Katraj Pune | मुसळधार पावसाने कात्रजचे पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले; पुण्यात पावसाची दमदार हजेरी
पुणे : Peshwa Lake Katraj Pune | जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर शहरातील काही भागात छाती एवढे पाणी साठले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत केली जात आहे. (Pune Flood)
कात्रज डोंगरमाथा व घाट परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून आणणारे गुजरवाडी ओढा व मांगडेवाडी ओढा पूर्णपणे क्षमतेने भरून वाहत आहे. तर कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. (Pune Rains)
कात्रज तलावातून (Nanasaheb Peshwa Lake) ओढ्यात मोठ्या प्रमाणात फांद्या वाहून येत होत्या. त्यामुळे मुख्य प्रवाहास अडथळा निर्माण होत होता. स्थानिकांनी त्या फांद्या हटवून प्रवाह सुरळीत केला. नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पासून पुढे आंबील ओढ्यामधून पाणी पुढे जाते त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पाहणी करत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाने नेमके कुठे काय घडले थोडक्यात…
- कात्रज सह गुजर- निंबाळकरवाडी, भिलारेवाडी पाझर तलाव तुडुंब
- सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सुरु
- कात्रज, कोंढवा, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा रोड, गोकुळनगर, भारती विद्यापीठ, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील मुख्य व
अंतर्गत रस्त्यांना ओढे- नाल्याचे स्वरूप - कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक मंदावली
- कात्रज-मांगडेवाडी रस्त्यावरील खाजगी कंपनीची भिंत कोसळून एका चारचाकीचे नुकसान
- माऊली नगर येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
- लेक टाऊन, महालक्ष्मीनगर सोसायटी येथे झाड कोसळल्याची घटना
- राजस आणि उत्कर्ष सोसायटी परिसरातील विजपुरवठा दिवसभर खंडित
- राजस सोसायटी चौकाला तळ्याचे स्वरूप
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी