Pune Flood | धरणातून पाणी सोडल्याने भीमा, मुळा – मुठा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
पुणे : Pune Flood | जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे तर या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे भीमा आणि मुळा-मुठा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होऊन दौंड, शिरूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
खडकवासला धरणातून नद्यांना सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. धरणातून सोडण्यात आलेले व इतर उपनद्यातून भीमा नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास दौंड तालुक्यात भीमा, मुळा मुठा नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावातील तसेच वस्तीवरील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहात विठ्ठलवाडी, पाटेवाडी, वडगाव बांडे , दहिटणे , राहू , आलेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. (Pune Flood)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी