PMC Health Department-Dr.Nina Borhade | महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. नीना बोर्‍हाडे यांची नियुक्ती; शासन सेवेतील दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी महापालिकेत दाखल

Pune PMC News | The work of transporting dry waste to cement companies has been extended for the fourth time; Solid Waste Department and senior officials struggle for the preferred contractor

पुणे : PMC Health Department-Dr.Nina Borhade | महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नांदेडच्या जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोर्‍हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरूवारी यासंदर्भातील आदेश काढले असून शुक्रवारी त्या पदभार स्वीकारतील, अशी माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार (Dr Bhagawan Pawar) यांचे शासनाने एका तक्रारीवरून निलंबन केले आहे. त्यांच्या निलंबनानंतर मागील दीड महिन्यांपासून महापालिका सेवेतील उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्य प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दरम्यान, बुधवारी रात्री राज्य शासनाने आणखी दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची महापालिकेमध्ये नियुक्ती केली आहे. यामध्ये गोंदिया नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सुनिल बल्लाळ (Sunil Ballal) आणि चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी प्रशांत ठोंबरे (Prashant Thombre) यांचा समावेश आहे. हे दोघे देखिल गुरूवारी महापालिकेत दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्यावेळी शासन सेवेतील पाच उपायुक्तांची शहरातून बदली झाली होती. त्यापैकी उपायुक्त चेतना केरूरे आणि आशा राउत यांनी मॅटमध्ये या बदलीला आव्हान दिले होते. मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांची पुन्हा महापालिकेत नियुक्ती केली आहे. उपायुक्तांच्या चार जागा भरल्याने विद्यमान उपायुक्तांचे अतिरिक्त पदभार हलके होणार असून काहींची खांदेपालट होईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. (PMC Health Department-Dr.Nina Borhade)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed