MLA Sunil Tingre – Pune Flood | आमदार सुनिल टिंगरे पुरग्रस्तांच्या मदतीला धावले; विश्रांतवाडी भागातील पुरग्रस्तांना पाण्यात उतरून मदत (Video)
विश्रांतवाडी : MLA Sunil Tingre – Pune Flood | विश्रांतवाडी भागातील शांतीनगर, इंदिरानगर भागात पुराचे पाणी शिरले आणि येथील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी आमदार सुनिल टिंगरे हे कार्यकर्त्यांसह पुराच्या ठिकाणी पोहचले, पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी नागरिकांना बाहेर काढण्यास मदत केली आणि प्रशासकिय यंत्रणाही कामाला लावली, त्यामुळे पुरग्रस्त नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. (MLA Sunil Tingre – Pune Flood)
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराने विश्रांतवाडी भागातील शांतीनगर, इंदिरानगर, भारतनगर आणि कलवड या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक कुंटुंब या पुरात अडकली. या माहिती समजताच वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे कार्यकर्त्यांसमवेत पुरग्रस्त भागात पोहचले. शांतीनगर भागात त्यांनी पुरामुळेच घरात अडकलेल्या तीन कुटुंबाना अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांच्या मदतीने बाहेर काढले. इंदिरानगर वसाहतीत गायकवाड कुंटुंबातील सात नागरिकांना पुराच्या बाहेर काढले. यामध्ये 75 वर्षांच्या आज्जीला पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. भारतनगर आणि कलवड भागातील पुरग्रस्तांना आमदार टिंगरे यांनी बाहेर काढण्यासाठी मदत केली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधून पुरग्रस्तांना मदत करण्याबाबत सुचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेविका शितल सावंत, अजय सांवत, रवि टिंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था
शांतीनगर येथील नानासाहेब परुळेकर शाळेत चारशे कुटुंब तर आण्णाभाऊ साठे सभाग़ृह येथे तिनशे कुंटुंब तर वि. दा. घाटे शाळेत पाचशे पुरग्रस्तांची निवासाची सोय करण्यात आली आहे. या पुरग्रस्तांना दुपारी आणि रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी