Katraj Pune Crime News | काञज येथून पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला
पुणे : Katraj Pune Crime News | शहरात बुधवारी झालेला मुसळधार पाऊस आणि आलेले पाणी यामुळे त्यादिवशी सायंकाळी काञज लेकटाऊन येथून एक युवक (अक्षय संजय साळुंखे, वय २६) वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास झाली होती.
त्यानूसार त्याचवेळी अग्निशमन दलाकडून (Pune Fire Brigade) प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. परंतू, धरण क्षेञातून वाढता विसर्ग व पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊन ही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम व काञज अग्निशमन वाहन लेकटाऊन व जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपा जवळील नदीपाञ येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युध्दपातळीवर शोधकार्य करीत होते. त्याचवेळी आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून येताच अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे, कमलेश चौधरी आणि सुमारे वीसच्या आसपास जवान यांनी सहभाग घेतला. तसेच या घटनेत पोलिस विभाग, जीवरक्षक, ड्रेनेज विभाग यांचे ही सहकार्य लाभले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता