Prataprao Govindrao Chikhalikar | पुण्यात वास्तव्यास असलेल्या कंधार-लोहाकरांसाठी चिखलीकरांचा उद्या स्नेहसंवाद मेळावा
पुणे : Prataprao Govindrao Chikhalikar | उद्योग ,व्यवसाय, नोकरी आणि कामानिमित्त कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघातील नागरिक पुणे येथे वास्तव्यास आहेत अशा सर्व नागरिक, मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने स्नेहसंवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता चंद्रफुल गार्डन आळंदी रोड चऱ्होली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंवाद मेळाव्यास भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे, राज्यसभेच्या सदस्या डॉ. मेधाताई कुलकर्णी, विधान परिषदेच्या सदस्या उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, चिंचवड आमदार अश्विनीताई जगताप , खडकवासला आमदार भीमराव अण्णा तपकीर , माजी आमदार जगदीश मुळीक , पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे , पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप , माजी महापौर तथा नगरसेवक नितीन आप्पा काळजे यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातील (Loha Kandhar Assembly Constituency) जे मतदार आणि नागरिक पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत या सर्व नागरिकांशी हितगुज करून संवाद साधला जाणार आहे . आयोजित स्नेह संवाद सोहळ्याला लोहा आणि कंधार तालुक्यातील आणि मतदारसंघातील पुणे येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता