Vishrantwadi Pune Crime News | हॉर्न वाजविण्यावरुन झालेल्या वादात गन रोखून जीवे मारण्याची धमकी; टोळक्यावर गुन्हा दाखल, परस्परविरोधी तक्रारी दाखल

marhan

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | मंगल कार्यालयाच्या दारात हॉर्न वाजविण्यावरुन झालेल्या वादात ५ ते ६ जणांनी तरुणावर गन रोखून तुला येथेच संपवून टाकतो, अशी धमकी देऊन चॉपरने हल्ला (Chopper Attack) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अजय जितेंद्र बाटुंगे (वय २४, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना टिंगरेनगरमधील (Tingre Nagar Vishrantwadi) लेन नं. २ चे समोर गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मुलीचे लग्नाचे मेंहदीचा कार्यक्रम टिंगरेनगरमधील तिरुपती मंगल कार्यालयात होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर पाहुणे घरी जात असताना कार्यालयाचे गेटवर हॉर्न वाजविण्याचे कारणावरुन फिर्यादीचे नातेवाईक व सियाज चारचाकी कारचा चालक यांच्यात किरकोळ भांडणे झाले. त्यानंतर फिर्यादी हे घरी जात असताना ५ ते ६ जणांनी फिर्यादींचा पाठलाग केला.

फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यातील एकाने हातातील गन फिर्यादींवर रोखून तुला माहित आहे काय आम्ही कोण आहोत, असे बोलून फिर्यादी यांना शिवी देऊन तुला येथेच संपवून टाकतो, अशी धमकी दिली. दुसर्‍याने त्याचे हातातील चॉपरने फिर्यादी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी ज्याचे हाताला जोरात झटका दिल्याचे हातातील चॉपर निसटून दुसरीकडे पडला. फिर्यादीने पळून जाऊन स्वत:चा जीव वाचविला. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख (API Ansar Shaikh) तपास करीत आहेत.

तरुणाला मारहाण

यावेळी दुसर्‍या एका गटातील ८ ते १० जणांनी एका तरुणावर कोयत्याने (Attack On Youth) वार करुन जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत रोहित संजय परदेशी (वय ३४, रा. तिरुपती कॅम्पस, टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादीचा भाऊ भावेश परदेशी हे जखमी झाले आहेत.

फिर्यादी हे कामावरुन सियाज कारने घरी येत होते. यावेळी तिरुपती मंगल कार्यालय येथे आले
असताना मंगल कार्यालयात आलेल्या लोकामधील स्विफ्ट कारवरील चालकाने हॉर्न वाजवून
गाडी बाजुस घेण्यास सांगण्याच्या कारणावरुन त्याने व त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी लोखंडी वस्तूने
भावेश याच्या डोक्यात मारुन जखमी केले व त्यानंतर दोघांना हाताच्या चापटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करुन घेतल्या असून पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन

Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”