Babajani Durrani Join Sharad Pawar NCP | माजी आमदार बाबजानी दुर्राणींचा शरद पवारांच्या गटात प्रवेश, म्हणाले – ‘सुना है अच्छे दिन आने वाले है, बडा चालाख दुश्मन है, सहारा दे के मारेगा!’

Babajani Durrani - Sharad Pawar

छत्रपती संभाजीनगर : Babajani Durrani Join Sharad Pawar NCP | अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी शेरो शायरी करत भाजपाच्या राजकारणावर निशाणा साधला. दरम्यान, इतरही अनेकजण या मानसिकतेत असल्याचे सूतोवाच दुर्राणी यांनी केल्याने अजित पवार गटाच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आज घरवापसी केली. यावेळी दुर्राणी यांनी सूचक शब्दांत अजित पवार गटातील स्थिती मांडली.

भाषणाच्या सुरूवातीला बाबाजानी दुर्राणी म्हणाले, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, वरना कोई यूँ बेवफा नहीं होता. माझी अशी काही मजबुरी नव्हती. १९८० पासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे.

बाबाजानी दुर्राणी म्हणाले, पक्ष फुटल्यानंतर मी शरद पवारांसोबतच राहिलो. पण दोन महिन्यांनंतर काही कारणास्तव काही लोकांच्या सांगण्यावरून तिकडे गेलो. मी एवढेच सांगेन की शरद पवारांना सोडून गेलेले अनेक लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले. ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरे झालं मी शून्य होण्याआधीच आलो.

भँवर जब उभरेगा, उभारा दे के मारे गा
सुनो ऐ मछलियों, तुम्हे वो चारा दे के मारेगा
सुना है अच्छे दिन भी आने वाले है
बडा चालाख दुश्मन है, सहारा दे के मारेगा!

हा सूचक शेर दुर्राणी यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. दुर्राणी म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे चित्र मी पाहिले. लोकांची मानसिकता ही आहे की जे जे पक्ष भाजपाबरोबर गेले, लोकांनी त्यांना शून्य केले. १० वर्षांत देशात जातीवाद, धर्मवाद पसरवला. एका पंतप्रधानाला शोभणार नाही अशी भाषणे मोदींची झाली.

आज मुस्लीम समाजाला मदत करणारा, त्याच्या पाठीवर हात फिरवणारा एक व्यक्ती हवा आहे.
त्या समाजाला काही दिले नाही तरी चालेल, पण त्यांच्याकडे चांगल्या भावनेने पाहणारे नेतृत्व हवे. ते शरद पवारांचे आहे.

दुर्राणी म्हणाले, मला जे काही मिळाले, ते शरद पवारांमुळे मिळाले. मला आता खंत वाटते की मी शरद पवारांना सोडून गेलोच कसा? मला अनेक कार्यकर्ते, माझे सहकारी म्हणत होते की तुम्ही असा निर्णय कसा घेतला? असे दुर्राणी म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

Hadapsar Pune Crime News | फोन पे अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 5 लाख 22 हजारांचा गंडा; गुुगलवरुन बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन

Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”

You may have missed