Talegaon Dabhade Firing Case | तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक; 4 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त
चिंचवड पिंपरी – Talegaon Dabhade Firing Case | चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने (Pimpri Chinchwad Crime Branch) केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चार पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे येथील गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना मुंबई (Arrest Frm Mumbai) येथून अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी परिसरात (Sangvi Crime News) अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दोन्ही कारवाईमध्ये एकूण चार पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी खराडे आणि पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवीमधून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी रोहित दर्गेश धर्माधिकारी आणि अनिकेत सतीश काजवे याला अटक करण्यात आली आहे.
तळेगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात तिघांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर दोघेजण फरार होते. त्यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण द्वारे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धर्माधिकारी आणि काजवे दोघे अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळालेली होती. त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तर तिसऱ्या कारवाईमध्ये पाच वर्षांपासून हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चाकणमधून अटक करण्यात आली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय