Nashik Upnagar Police | होंडा सिटीमधून दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; नाशिक उपनगर पोलिसांची कामगिरी, दुसर्‍या दरोड्याच्या तयारीत असताना जाळ्यात

Nashik Upnagar Police

नाशिक : Nashik Upnagar Police | होंडा सिटीमधून येऊन वॉचमनला चाकूचा धाक (Robbery Case) दाखवून बोअरवेलमधील ३ जलपरी मोटारीसह साहित्य चोरुन नेले. त्यानंतर दुसरीकडे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना नाशिक उपनगर पोलिसंच्या पथकाने टोळीतील पाच जणांना पाठलाग करुन पकडले.

करण दयादास सोनवाणी (वय २०, रा. मंगलमूर्ती नगर, नारायण बापू नगर, जेल रोड, नाशिक रोड), वैभव बाबाजी पाटेकर (वय २०, रा. नर्मदा सोसायटी, लोखंडेमळा, नाशिक रोड), पुष्कर गुलाब उन्हवने (वय २०, रा. टाकळी रोड, नाशिक), धीरजकुमार नरेश प्रसाद (वय २०, रा. टाकळी रोड, नाशिक), राहुल अनुप कुमार (वय २०, रा. टाकळी रोड, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांडरे मळा येथे सुरु असलेल्या बांधकामच्या ठिकाणी वॉचमन झोपलेला होता. तेव्हा होंडा सिटी कारमधून सात जण आले. त्यांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून येथील बोअरवेलमधील ३ जलपरी मोटार, लिफ्टचे साहित्य दरोडा टाकून चोरुन नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (DCP Monika Raud), सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी (ACP Dr Sachin Bari) यांनी घटनास्थळी भेट देऊन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे (Sr PI Jitendra Sapkale) व पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ (PI Jayant Sirsat) यांना तपासाच्या सूचना दिल्या.

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला पोतदार स्कुलकडून समतानगरकडे जाणार्‍या रोडवरील एका बांधकाम साईटच्या बाजूला एक होंडा सिटी कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आली. तेव्हा पोलिसांनी या कारच्या समोर आपली गाडी नेऊन उभी केली. पोलिसांची गाडी पाहून होंडा सिटी सोडून चोरटे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांच्यातील पाच जणांना पकडले. त्यांच्यातील एक जण पळून गेला. त्यांच्या ताब्यातून चाकू, मिरची पुड, नायलॉन दोरी, हातोडी, स्क्रु ड्रायव्हर अशी दरोडा टाकण्यासाठी लागणारी शस्त्रे हस्तगत केली. त्यांच्या होंडा सिटी कारच्या डिकीमध्ये बोअरवेलमधील दोन जलपरी मोटार आढळून आल्या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त डॉ. मोनिका राऊत,
सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,
पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे,
उपनिरीक्षक सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पोलीस शिपाई जयंत शिंदे, सुरज गवळी,
संदेश रगतवान, सुनिल गायकवाड, सौरभ लोंढे, मिलिंद बागुल, सतिश मढवई, मुकेश क्षीरसागर यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय