Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु
पुणे : Mundhwa Pune Crime News | नवीन मोटारसायकल घेतल्याने मित्राबरोबर तिच्यावरुन राईड मारणे तरुणाच्या जीवावर बेतली. भरधाव जाणार्या पाण्याच्या टँकरची धडक बसून त्यात तरुणाचा मृत्यु झाला. (Youth Died In Accident At Mundhwa)
अथर्व कुंभार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना केशवनगर येथील रेणुका माता मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याबाबत अमन विनोद चौधुर (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टँकरचालक संतोष शिवसेवक सिंह (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. (Mundhwa Pune Accident News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नवीन मोटारसायकल घेतली. त्यांचा मित्र अथर्व कुंभार याला घेऊन ते नवीन मोटारसायकलवरुन फेरफटका मारण्यासाठी मंत्रा सोसायटीपर्यंत गेले व तेथून परत घरी येताना रेणुका माता मंदिरापासून काही अंतर पुढे आल्यावर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले असून अथर्व कुंभार यांचा मृत्यु झाला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय