Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

Sharad Pawar

मुंबई : Sharad Pawar | नवी मुंबईतील वाशी (Vashi) येथे आयोजित सामाजिक एकता परिषदेच्या (Ekta Parishad Vashi) निमित्ताने शरद पवार यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे (Manipur Issue) महाराष्ट्रात अशांततेची भीती व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पुढे असेही सांगितले की , राज्याच्या समृद्ध परंपरेमुळे अशा घटनांना महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. यावेळी त्यांनी मणिपूरमधील घटनांवर भर दिला. सध्या तिथे एकेकाळी एकत्र राहणारा कुकी- मेतेई समुदाय आता एकमेकांविरोधात हिंसाचार करीत आहे. अनेक महिन्यांपासून दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूरमधील परिस्थितीचे गांभीर्य सांगून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, ” मणिपूरमधील हिंसाचारामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, महिलांना त्रासाला सामोरे जावे लागले तर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एकेकाळी मणिपूरमध्ये जिथे दोन समुदाय एकत्र राहत होते, आता ते एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत.”

ते पुढे म्हणाले, ” आज जे काही घडलं त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असं कधीच वाटलं नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले. कर्नाटकातही तेच दिसून आले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे. त्यामुळे अशा घटनांना राज्यात स्थान मिळणार नाही.

दरम्यान महाराष्ट्रातही गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरु आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे.
अशात मराठा समाजाचा (Maratha Samaj) ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय होईल असा दावा करत
ओबीसी नेते या मागणीला विरोध करत आहेत. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये कटुता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होत आहे.” (Maratha Reservation)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

Hadapsar Pune Crime News | फोन पे अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 5 लाख 22 हजारांचा गंडा; गुुगलवरुन बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

You may have missed