Crocodile In Bhima River | भीमा नदीत भली मोठी मगर; शेतकरी भयभीत तर मच्छिमार चिंतेत

Crocodile In Bhima River

दौंड : Crocodile In Bhima River | जिल्ह्यांच्या धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. त्यातून मुळा-मुठा द्वारे भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. हा पाण्याचा विसर्ग उजनी धरणात जातो. शनिवारी दौंड तालुक्यामध्ये अचानक एक मोठी मगर भीमा नदीच्या पात्रात दिसून आली आणि शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. (Daund News)

दौंड तालुक्यातील आलेगाव ते देऊळगाव राजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना शनिवारी भली मोठी मगर दिसून आली. ही मगरच आहे का? हे पाहण्यासाठी त्यांनी पाण्यात दगड भिरकावला. त्याच वेळी मगरीने तेथून पळ काढला.

सन २०१७ मध्ये उजनी धरणामध्ये मगर असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. त्यानंतर भीमा नगरच्या उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या मत्स्यबीज केंद्रामध्ये एक मगर सुरक्षितरित्या पकडण्यात आली. करमाळा तालुक्यातील कंदर येथेही एक मगर पकडण्यात आली.

त्यानंतर तब्ब्ल पाच वर्षांनी भीमा नदी किनारच्या शेतकऱ्यांमध्ये आता पुन्हा मगरीने भीती दाखवली आहे. भीमा नदीचे पाणी उजनीत जाऊन मिळते. त्यामुळे ही मगर नेमकी कुठे जाणार हे प्रश्न असल्याने मच्छिमार आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed