Sharad Pawar | ‘शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका’; शरद पवारांचा निशाणा

sharad-pawar

मुंबई : Sharad Pawar | दि मंगेश आमले इनिशेटिव्ह (The Mangesh Amle Initiative) यांच्या वतीने नवी मुंबई (Navi Mumbai) येथे देशातील पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेचे (Samajik Ekya Parishad) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्षपद शरद पवार यांनी भूषविले. यावेळी त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना समानता व ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका म्हणत थेट निशाणा साधला. शिवाजी महाराज आणि त्यांनी सामाजिक एकतेसाठी केलेले काम याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, “या देशात आजपर्यंतच्या काळात अनेक राजे होऊन गेले पण आज ३५० वर्षांनंतरही त्यांनी केलेल्या कार्याचा कुठे उल्लेख आला तर शिवाजी महाराजांचे नाव पहिल्या स्थानी असते. देशात यादव आणि मुघल राजे होऊन गेले त्यांची राज्ये त्यांच्या नावाने ओळखली जायची. पण शिवाजी महाराजांचे राज्य त्यांच्या नावाने नव्हे तर रयतेचे राज्य आणि हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले.”

ते पुढे म्हणाले, ” महाराष्ट्र हे रयतेचे राज्य असल्याचे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवले. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका संदर्भातील प्रश्न आता तेव्हा स्थानिक समाजातील काही लोकांनी हा अभिषेक करण्यासाठीही नकार दिला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावे लागले आणि अभिषेक करावा लागला. याचा अर्थ असा की, त्या कालखंडातही ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता. आणि दुर्दैवाने तो आजही कुठे ना कुठे पाहायला मिळतोय “, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed