Lakhpati Didi Scheme | लखपती दीदी योजना! महिलांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी 5 लाखांपर्यतचे कर्ज; जाणून घ्या

Majhi Ladki Bahin Yojana

मुंबई : Lakhpati Didi Scheme | केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवल्या जात असतात. या योजनांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेचे नाव ‘लखपती दीदी’ आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

मोदी सरकारने (Modi NDA Govt) १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदत देखील केली जाते. या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा? याबाबत टिप्स देखील दिल्या जातात.

या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स, बिझनेस मार्केटिंग प्लॅन याबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंग बाबत माहिती दिली जाते. आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेमुळे बचत गटाशी संबंधित महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात भेट द्यावी लागेल.
त्यानंतर योजनेचा फॉर्म अधिकाऱ्याकडून घ्यावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही सर्व माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे जमा करा. त्यानंतर अर्जदाराला पावती दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो,
पॅन कार्ड, बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत महिलांना आर्थिक साक्षरता वर्कशॉप,
सेव्हिंग इन्सेंटिव्ह, मायक्रोक्रेडिट सुविधा, स्किल डेव्लपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed