Pune Accident News | बीआरटी मार्गावर BMW कार आणि स्कुलबसची समोरासमोर धडक; चालकासह 2 विद्यार्थी जखमी (Videos)

BMW Car- Podar International School Bus Accident

चिंचवड : Pune Pimpri Chinchwad Accident News | चिंचवड येथील ऑटो क्लस्टर (Auto Cluster Chinchwad) येथे बीआरटी मार्गात (Accident On BRT Route) आज (दि.२९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास BMW कार आणि स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. यात कारचालक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले. यश मित्तल (२९, रा. आकुर्डी) असे जखमी कार चालकाचे नाव आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग (Sr PI Ashok Kadlag) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी पोदार इंटरनॅशनल स्कूल (Podar International School) संस्थेची स्कुलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. कार आणि स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. यात कारचे तसेच स्कुलबसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील विविध मार्गांवर बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) कॉरिडॉर उभारले आहेत. पीएमपीएमएल बससेवा अधिक सक्षम होण्यासह प्रवाशांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती केली. केवळ पीएमपीएमएल बसलाच या बीआरटी मार्गात प्रवेश आहे. (Pune Accident News)

मात्र, तरीही इतर वाहनांची या मार्गात घुसखोरी होते. परिणामी अपघात होतात.
आटो क्लस्टर येथील अपघातात अशाच पद्धतीने स्कूल बस आणि कारचालकाने घुसखोरी केली असल्याचे समोर आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed