Maval Assembly Constituency | मावळ मतदारसंघावर भाजपचा दावा; आमदार सुनील शेळकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजप करणार शक्तिप्रदर्शन
मावळ: Maval Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली आहे. मात्र महायुतीत जागा वाटपावरुनचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. २ ऑगस्ट रोजी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आमदार शेळके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Maval Assembly Constituency)
मावळ विधानसभा मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सलग २५ वर्षांपासून मावळातून भाजपचा आमदार निवडून येत होता. परंतु, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. पक्षाने बाळा भेगडे (Bala Bhegade) यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे तत्कालीन नगरसेवक असलेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेळके यांनी राज्यमंत्री असलेले भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती (Mahayuti) म्हणून एकत्रित विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ’ असे महायुतीचे प्राथमिक सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु, घटक पक्षाचा आमदार असलेल्या मावळ मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. ही जागा कमळाच्या चिन्हावर लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. यासाठी २ ऑगस्टला मावळ भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
याबाबत माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, ” रामभाऊ म्हाळगी यांनी १९५७ ला जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९५७ ते २०२४ या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार मावळच्या जनतेने निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत. कमळ चिन्ह हाच आमचा चेहरा असेल”, असे भेगडे म्हणाले.
सुनील शेळके हे अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार आहेत.
मागील पाच वर्षात भाजप पदाधिकारी आणि शेळके यांच्यात अनेकदा खटके उडले आहेत.
दरम्यान एकत्र व्यासपीठावर येणेही ते टाळत होते.
आता भाजपने या मावळ मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु