Pune Crime News | जमीन मालकाला मागितली तब्बल 1 कोटीची खंडणी; रांजणगावात खंडणी व चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे
शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Ranjangaon Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील एका इसमाच्या जमिनीमध्ये बेकायदेशीपणे अतिक्रमण (Illegal encroachment on land) करुन मालकी असल्याचे फलक लावून जमिनीतील मुरूम जेसीबीच्या सहाय्याने चोरी करुन जमीन मालकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची (Extortion Case) घटना समोर आली आहे.याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Station) येथे गंगेश्वर दत्तात्रय सोनवणे (Gangeshwar Dattatraya Sonwane) व संदीप सुदाम कुटे (Sandeep Sudam Kutte) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे गणेश पाचुंदकर यांच्या मालकीची जमीन असून सदर जमिनीमध्ये गंगेश्वर सोनवणे याने अतिक्रमण करत त्याच्या मालकीची जागा असल्याबाबत फलक लावले त्याबाबत गणेश यांनी विचारणा केली असता शिवीगाळ, दमदाटी केली त्यांनतर २७ जुलै रोजी गंगेश्वर सोनवणे व संदीप कुटे या दोघांनी सदर जमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम काढून मुरुमाची चोरी केली, त्यावेळी गणेश यांनी त्या दोघांना मुरुम चोरीबाबत विचारले असता “तुला रहायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये दे, अन्यथा पंचवीस गुंठे जागा दे, नाहीतर असा त्रास तुम्हाला होतच राहील अशी धमकी देत दोघांनी गणेश यांना शिवीगाळ, दमदाटी केली. (Pune Crime News)
याबाबत गणेश बापू पाचुंदकर वय ३५ वर्षे रा. पाचुंदकर वस्ती, रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गंगेश्वर दत्तात्रय सोनवणे व संदीप सुदाम कुटे दोघे रा. फंडवस्ती रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर खंडणी सह अतिक्रमण व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश