Venezuela | पेट्रोल 2 रुपये लीटर, पण खायला अन्न नाही, 10 वर्षात राजापासून रंक झाला हा देश, तरीही तोच राष्ट्राध्यक्ष निवडून आला

Venezuela

नवी दिल्ली : Venezuela | व्हेनेझुएला या लॅटिन अमेरिकन देशाकडे जगातील सर्वात मोठा इंधन साठा आहे. एकेकाळी हा देश लॅटिन अमेरिकेचा सर्वात टॉप इकोनॉमी होता. परंतु, 10 वर्षात या देशाचे असे पतन झाले की, सर्व काही उद्ध्वस्त झाले. आपल्या देशाच्या या बरबादीला राष्ट्रपती निकोलस मादुरो जबाबदार आहेत, असे येथील जनता मानते. धक्कादायक म्हणजे मादुरो हेच पुन्हा निवडणूक जिंकले आहेत. यामुळे महागाई आणि गरिबी असह्य झाल्याने दहा वर्षात येथील 70 लाख लोकांनी देश सोडला आहे.

मादुरो यांच्या कार्यकाळात व्हेनेझुएलाचा जीडीपी 80 टक्केपर्यंत आला आहे. आता या देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे रसातळाला गेली आहे. येथील महागाई दरावरून देशाची स्थिती समजते. जो 10 वर्षात 130,000 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. व्हेनेझुएलामध्ये वीज संकटापासून अनेक प्रकारच्या संकटांना सामान्य माणूस तोंड देत आहे.

2 रुपये इंधन, पण भाकरी खुप महाग
व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा इंधन साठा आहे. येथे एक लीटर पेट्रोलचा दर 2 रुपयापेक्षा सुद्धा कमी आहे. तेलाचा खजिना असून सुद्धा या देशातील लोक भाकरीसाठी त्रस्त आहेत. कारण, व्हेनेझुएलामध्ये किरकोळ महागाईचा दर जगात सर्वाधिक आहे. स्थिती अशी आहे की येथे गरीब लोक शिळे, उष्टे अन्न नाईलाजाने खात आहेत.

या बिकट स्थितीमुळे एका दशकात 70 लाखापेक्षा जास्त लोकांनी देश सोडला आहे. प्रश्न असा आहे की, अखेर या देशाची स्थिती अशी का झाली? या देशातील सत्ताधार्‍यांचे आर्थिक धोरण आणि अमेरिकेसोबतच्या वादामुळे देशाची ही स्थिती झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 10 वर्षाच्या सत्ताकाळातील कमजोर आर्थिक धोरणामुळे महागाई वेगाने वाढली आहे. (Venezuela)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed