Devendra Fadnavis- New BJP President | देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? मोदींच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis-PM Narendra Modi

पुणे : Devendra Fadnavis- New BJP President | राजकीय वर्तुळातून एक मोठी माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे अध्यक्ष असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षाच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातून भाजप महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade) आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत.

मागेच स्वतः फडणवीसांनी पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागा घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या पदासाठी ज्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत त्यात फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

फडणवीस यांनी सपत्नीक नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे याबाबतचे संकेत मिळत आहेत की पक्ष नेतृत्व फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठ्या पदावर नियुक्त करण्याच्या विचारात आहे. याआधी भाजप आणि आरएसएस यांच्यात नावांबाबतीत काही मतभेद होते. यामुळे राष्ट्रीय भाजप प्रमुखांच्या नियुक्तीत उशीर झाला. पण आता फडणवीसांबाबत सहमती बनताना दिसत आहे. यामुळेच आताची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. (Devendra Fadnavis- New BJP President)

फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री ते राज्यातील सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यावरून भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा फिट आणि योग्य उमेदवार मानले जात आहेत.

फडणवीसांचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्याशी चांगले संबंध आहेत.
तसेच फडणवीस संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत.
त्यामुळे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद