Pune Crime News | पोलीस ठाण्यातच टोळक्याकडून फिर्यादीला मारहाण; 17 जणांविरोधात गुन्हा दाखल; बारामतीत खळबळ

marhan

बारामती : Baramati Pune Crime News | आमराईत झालेली भांडणे फिर्यादी पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ आरोपीही धावत आले. त्यानंतर पोलीस ठाण्यातच दोन गटात हाणामारी सुरु झाली . पोलीस ठाण्यातील आरसा फोडण्यात आला तसेच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police Station) दोन्ही गटातील १७ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्याचाही गुन्हा दाखल केला आहे. याव्यतिरिक्त मारहाणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी जगताप, विकास जगताप, तनु जगताप, अजय नागे, अनिता दिनेश जगताप (सर्व राहणार आमराई, बारामती) आणि अन्य सात ते आठ अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी देखील घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. बंटी जगताप हा जखमी अवस्थेत शहर पोलीस ठाण्यात आला होता. त्याच्यासोबत अनिता दिनेश जगताप आणि अन्य पाच जण आले होते. पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी दिल्यानंतर तेवढ्यात धीरज पडकर हा तेथे आला. त्याला बंटी जगताप आणि इतरांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकाने तेथीलच पोलीस ठाण्यातील आरसा फोडून त्या आरशाची काच धीरजच्या पोटात घालण्यासाठी पुढे आणली. त्यास पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

दुसरीकडे गौरव दिलीप जगतापने दिलेल्या फिर्यादीवरून, धीरज पडकर, सचिन पडकर,
प्रेम रणपिसे या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव हा सोमवारी मध्यरात्री घरी असताना
धीरजने फोन करून गौरवला परिसरात नेले. तु माझ्या पत्नीला काय बोलला,
अशी विचारणा करत त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सचिन राजेंद्र पडकर (रा. भोईटे हॉस्पिटलशेजारी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
बंटी जगताप याच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यात आलो
असता गेटवरच दहा ते बारा जण थांबले होते.

पोलीस ठाण्यातच मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून बंटी जगताप,
विकी जगताप, बबलू जगताप, अनिता जगताप, गणेश पाठक, अजय उर्फ गोट्या नागे,
गौरव भंडारे व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed