Pune Drug Case | व्हायरल व्हिडिओतील अमली पदार्थ सेवन करणार्यास जामीन; फर्ग्युसन रोडवरील एल थ्री बार ड्रग्स पार्टी प्रकरण

पुणे : Pune Drug Case | फर्ग्युसन रोडवरील (FC Road Pune) लिक्विड लीजर लाऊंज (एल थ्री) बारमध्ये (L3 Bar Pune) झालेल्या पार्टीतील समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओत अमली पदार्थाचे सेवकन करणारा तरुण करण राजेंद्र मिश्रा (Karan Rajendra Mishra) याला सत्र न्यायाधीश जे़ जी़ डोरले यांनी जामीन मंजूर केला.
अमली पदार्थ सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी करण मिश्रा याला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याची कबुली दिली होती. अधिक तपासानंतर अमली पदार्थ पुरवठादार अभिषेक सोनावणे, ओकार सकट व नायजेरियन युवक इडोको संडे यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. (Pune Drug Case)
करण मिश्रा याने अॅड. अमेय बलकवडे (Adv. Amey Balkawde) यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मिश्रा याच्याकडून कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही. मिश्रा याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. तो एका खाजगी कंपनीत अभियंता आहे. मुंबई उच्च न्यायालयातील आर्यन शाहरुख खान या केसचा दाखला अॅड. अमेय बलकवडे यांनी न्यायालयात सादर केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश डोरले यांनी काही अटी व शर्तीवर करण मिश्रा याचा जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने अॅड. अमेय बलकवडे, अॅड. मयूर मराठे (Adv. Mayur Marathe), अॅड. ऋषिकेश कडू (Adv. Rishikesh Kadu), अॅड. रोहित गुजर (Adv. Rohit Gujar), अॅड. सुरज शिंदे (Adv Suraj Shinde) यांनी काम पाहिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश