Pune Crime News | बघून चालत जा, असे म्हंटल्याने तिघांना जबर मारहाण करून लुबाडले

Lonikand-Police-Station

पुणे : Wagholi Pune Crime News | चालताना धक्का लागला या किरकोळ कारणावरून पाच जणांनी तिघांना मारहाण करून जबरदस्तीने कारमधून दुसरीकडे नेले. तिकडे त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे लुबाडले. ही घटना वाघोली तील चोखीधानी रोडवर रविवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतलं आहे.

शुभम नथुराम जाधव (वय २४, रा. साई सत्यम वाघोली), आनंदा हनुमंत पाटील (वय १९ रा. उबाळे नगर वाघोली) एक अल्पवयीन व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकमन हसमत हश्मी (वय २१, रा. चोखीधानी रोड ,वाघोली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकामन हश्मी, समीर हश्मी, विवेक गोस्वामी हे तिघे भाजी खरेदी करत होते. यावेळी आनंदा पाटील याला चालताना धक्का लागला. लोकामन हा बघून चालत जा असे आनंदा याला म्हणाला यावरून राग आल्याने आनंदा व इतर चार जणांनी त्या तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. (Pune Crime News)

त्यांनी आणलेल्या कारमधून तिघांना दुसरीकडे नेले. येथे लोकामन याच्याकडून जबरदस्तीने १८ हजार रुपये ऑनलाईन घेतले.
त्यानंतर पुन्हा तिघांना जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच एकाचा मोबाईल काढून घेतला.

लोकामन याने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.
इतर दोघेही लवकरच ताब्यात येतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर व पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed