GST On Life Medical Insurance Premiums | स्वस्त होणार लाईफ आणि हेल्थ इंश्युरन्स प्लान, पण नितीन गडकरींची विनंती अर्थमंत्री सितारमण ऐकतील का? प्रीमियमवरील 18% जीएसटी हटविण्याची मागणी
नवी दिल्ली – GST On Life Medical Insurance Premiums | जर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपले सहकारी मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांची विनंती मान्य केली तर आगामी काळात लाईफ आणि मेडिकल इंश्युरन्सचा प्रीमियम कमी होऊ शकतो. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी लाईफ आणि मेडिकल इंश्युरन्स प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे.
नितीन गडकरी यांनी 28 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपणास विनंती आहे की, आपण लाईफ आणि हेल्थ इंश्युरन्स प्रीमियमवरील जीएसटी हटविण्याच्या सूचनेला प्राधान्य देऊन विचार करावा. कारण तो न पेलवणारा होतो. सध्या, आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियम, दोन्हीवर 18 टक्के जीएसटी लागतो.
कर्मचार्यांनी केली नितीन गडकरींकडे मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, आयुर्विमा आणि आरोग्य विमा, आज प्रत्येक व्यक्तीची गरज आहे आणि सामाजिक दृष्टीने आवश्यक आहे. अशावेळी या उत्पादनांच्या प्रीमियमवर 18 टक्के टॅक्स, या क्षेत्राच्या वाढीला देखील प्रभावित करतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लिहिलेले हे पत्र, नागपुर मंडळ आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या उत्तरादाखल होते. या कर्मचारी संघटनेने इंश्युरन्स इंडस्ट्री समोरील समस्या मांडत नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. (GST On Life Medical Insurance Premiums)
आपल्या निवेदनात कर्मचारी संघटनेने म्हटले आहे
की, आयुर्विम्याच्या हप्त्यावर जीएसटी लावणे जीवनाच्या अनिश्चिततेवर टॅक्स लावण्यासारखे आहे.
आम्हाला वाटते की, एखादा व्यक्ती कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करतो,
अशावेळी या इंश्युरन्स कव्हर खरेदीच्या प्रीमियमवर टॅक्स लावू नये.
जर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नितीन गडकरी यांची सूचना स्वीकारली
तर लाईफ आणि हेल्थ इंश्युरन्सचा प्रीमियम कमी होऊ शकतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार