Pooja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणाची धग नाशिकपर्यंत; तहसीलदारासह 33 शिक्षक अडचणीत

IAS Puja Khedkar

नाशिक : Pooja Khedkar | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र (Fake Desirability Certificate) बनवल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात असताना आता असे प्रकरण आता बाकी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणीचा धडाका लावला आहे.

त्यात तहसीलदार बाळू मरकड (Balu Markad) हे देखील अडकले आहेत. विविध तक्रारींकरून राज्य सेवा आयोगाने दिव्यांग प्रमाणपत्र असलेले महाराष्ट्र सरकारच्या महसूल शाखेतील तहसीलदार बाळू मरकड यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात तहसीलदार मरकड यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळले आहे.

नियमानुसार ४० टक्के अथवा त्याहून अधिक दोष अपेक्षित आहे. तहसीलदार मरकड यांना कर्ण व दृष्टी दोष २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यासंदर्भात शल्य चिकीत्सक डॉ. कपिल आहेर (Dr. Kapil Aher) अडचणीत आले आहेत. श्री. मरकड नाशिक बाहेरचे असतानाही डॉ. आहेर यांनी हे प्रमाणपत्र दिले होते. राज्य सेवा आयोगाची देखील यात फसवणूक झाली.

यानिमित्ताने पूजा खेडकर प्रकरणाने बनावट प्रमाणपत्र आणि नियुक्तीच्या गैरव्यवहाराच्या सुरस कथा बाहेर पडल्यात. त्यामुळे सबंध प्रशासनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेषतः आरोग्य विभागाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. शासनाने सर्वच नियुक्त केलेल्या दिव्यांगांची प्रमाणपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका नाशिकच्या ३३ शिक्षकांना देखील बसला आहे. (Pooja Khedkar)

जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने ही प्रमाणपत्रे खरी आहेत का? याची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी दिले होते.

या मोहिमेत दिव्यांग म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली.
या तपासणीत ५९ कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागात दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नव्हती.
यामध्ये ३३ शिक्षक आहेत. १० मुख्याध्यापक आणि ४५ शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
याशिवाय अन्य विभागातही असे कर्मचारी असण्याची शक्यता आहे. त्याची माहिती संकलित केली जात आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकरचे प्रताप चर्चेत असताना लोकसेवा आयोगापासून
तर आता जिल्ह्यातील शिक्षकांची बनावटगिरी उघडकीस आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार