PMC News | पुणे महापालिकेच्या सेवेत तब्बल 36 वर्षे सायकलवर ये-जा करणारे स्टेनोग्राफर सुरेश परदेशी सेवानिवृत्तीच्या दिवशीही सायकलवरच घरी गेले

पुणे – PMC News | जवळपास छत्तीस वर्षांच्या सेवा काळात महापालिका भवनमध्ये सायकलवर ये- जा करणारा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा महापालिकेचा बहुधा अखेरचा कर्मचारी बुधवारी सेवानिवृत्त झाला.
सुरेश परदेशी असे त्या कर्मचार्याचे नाव आहे. आरोग्य विभागातून सिनियर स्टेनोग्राफर पदावर असताना ते सेवानिवृत्त झाले. १९८८ मध्ये महापालिका सेवेत दाखल झालेले परदेशी हे पहिल्या दिवसापासून सायकलवरच महापालिकेत ये जा करतात. महापालिकेच्या विविध विभागात काम करताना अन्य सहकार्यांनाही सायकल वापराने आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासही मदत होत असल्याचा उत्साह वाढवत राहीले. याचेच फलित म्हणून केंद्र सरकारच्या वसुंधरा मोहीमेअंतर्गत परदेशी यांनी पुढाकार घेउन महापालिकेमध्ये ‘सायकल क्लबची’ स्थापना केली. या माध्यमांतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येउ लागले. तसेच दरवर्षी आषाढी वारी पुर्वी या सायकल क्लबच्या माध्यमातून पुणे पंढरपूर सायकल यात्रेचे आयोजन सुरू झाले. (PMC News)
महापालिकेच्या ३६ वर्षाच्या सेवेतील वक्तशीरपणा आणि सायकल वापरामुळे परदेशींची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर नियमीत सहा वाजता सुट्टी झाल्यानंतर परदेशी हे सायकलवरच महापालिका भवनमधून बाहेर पडले. बहुधा महापालिकेत सायकलवर ये जा करणारे ते शेवटचेच कर्मचारी असावेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार